फवारणी साठी वापरत असलेले पाणी, फवारणीवर नक्की काय परिणाम करते याबाबत आपण विचार केला आहे ..?
आपण फवारणी करत असलेली जवळपास सर्वच औषधें हे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये येत असतात, जे कि आपल्याला पाण्यामध्ये टाकून मग त्यांची पिकांवर फवारणी घ्यावी लागते. फवारणी साठी वापरत असलेले पाणी हे अनेक ठिकाणाहून येते जसे कि नदी, विहीर, बोअरवेल इत्यादी. या प्रत्येक पाण्याचे गुणधर्म आणि त्याचा पीएच हा वेगवेगळा असतो. पीएच म्हणजेच पाण्याचा सामू हा १ ते १४ पर्यंत मोजला जातो. जेवढा पीएच कमी त्याला आपण ऍसिडिक म्हणजेच आमलधर्मी म्हणतो तर पीएच जास्त असेल तर त्याला आपण अल्कलाईन म्हणजेच अल्कधर्मी असे म्हणतो.
पाण्याचा पीएच ७ असेल तर त्याला आपण न्यूट्रल म्हणतो.
पाण्याचा पीएच हा अनेक औषधांच्या स्थिरतेवर परिणाम करत असतो. ज्यावेळी पाण्याचा पीएच वाढला जातो, अशा वेळी अल्कलाईन हायड्रोलिसिस होऊन अनेक औषदांची परिणामकता कमी होते. सर्वसाधारणपणे, पाण्याचा पीएच चा सर्वांत जास्त परिणाम हा कीटकनाशकांच्या रिझल्ट्स वर होतो. पाण्याचा पीएच जर अधिक असेल तर अनेक कीटकनाशकांचा रिझल्ट येत नाही.
२०० लिटर पाण्यात २०० ग्राम पावडर ज्यावेळी आपण टाकतो त्यावेळी, आकारमान लक्षात घेतले तर ९९% हे पाणी आणि १% च औषध असतं. जर आपले फवारणीचे पाणीचं खराब असेल तर म्हणजे ९९% भाग च खराब असेल तर १% औषध कितीही महागडे असले तरी त्याचे रिझल्ट आपल्याला म्हणावे असे मिळत नाहीत. त्यामुळे फवारणीपूर्वी पाण्याचा पीएच म्हणजेच सामू नक्की तपासावा.- श्री सुशांत सुर्वे.
पाण्याचा पीएच चा औषधांवर होणारा परिणाम हा हाल्फ लाईफ मध्ये मोजला जातो. म्हणजे एखाद्या औषधाची हाल्फ लाईफ जर १ तास असेल तर त्याचा अर्थ असा कि त्याचा रिझल्ट हा १ तास मध्ये ५० % ने कमी होतो, त्यापुढील एक तास मध्ये २५% ने कमी होतो, त्यापुढील १ तास मध्ये १२.५% ने कमी होतो इत्यादी. व त्यापुढे ते औषध परिणाम हा झिरो होतो.
पाण्याच्या पीएच चा विविध औषधांवर होणारा परिणाम हा वेगवेगळा असतो.
हाल्फ लाईफ म्हणजे काय हे आपण वर बघितले आहे. आता पाण्याचा पीएच चा हाल्फ लाईफ वर काय परिणाम होतो तसेच विविध औषधें कोणत्या पीएच ला अधिक स्थिर असतात याचे उदाहरण खालील टेबल मध्ये दिले आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये आपणास लक्षात येईल कि बरेचसे औषधे सोल्युशन कोणत्या पीएच ला अधिक स्थिर आहेत. जर आपल्या पाण्याचा पीएच ७ पेक्षा खूपच जास्त असेल तर औषधांचा योग्य रिझल्ट मिळणेसाठी, फवारणीपूर्वी तो नियंत्रित करणे गरजेचे आहे.
पाण्याचा पीएच कमी करण्यासाठी देखील काही अपवाद आहेत. म्हणजे कॉपर युक्त औषधे कमी पीएच असलेल्या पाण्यात जर टाकली तर ती अधिक सोल्युबल होतात, व त्यामुळे पिकांवर स्क्रोचिंग येऊ शकते. तसेच फॉस्फोनिक किंवा अन्य ऍसिड बेस बुरशीनाशके कि ज्यांचा पीएच आधीच कमी असतो असे औषधें मारताना पाण्याचा पीएच जर कमी केला तर ते पिकाला हानी पोहचवू शकतात. त्यामुळे औषधें फवारणीचा योग्य रिझल्ट येण्यासाठी, पाण्याचा पीएच मोजणे व तो योग्य करून घेणे गरजेचेच आहे, पण पीएच कमी करत असताना काही औषधांचा अपवाद लक्षात घेणे पण तितकेच महत्वाचे आहे. नाहीतर त्याचा परिणाम म्हणून पिकांवर स्क्रोचिंग येऊ शकते.

पीएच मीटर खरेदीसाठी येथे क्लीक करा.
पाण्याचा पीएच कमी करण्यासाठी देखील काही अपवाद आहेत. म्हणजे कॉपर युक्त औषधे कमी पीएच असलेल्या पाण्यात जर टाकली तर ती अधिक सोल्युबल होतात, व त्यामुळे पिकांवर स्क्रोचिंग येऊ शकते. तसेच फॉस्फोनिक किंवा अन्य ऍसिड बेस बुरशीनाशके कि ज्यांचा पीएच आधीच कमी असतो असे औषधें मारताना पाण्याचा पीएच जर कमी केला तर ते पिकाला हानी पोहचवू शकतात.
त्यामुळे औषधें फवारणीचा योग्य रिझल्ट येण्यासाठी, पाण्याचा पीएच मोजणे व तो योग्य करून घेणे गरजेचेच आहे, पण पीएच कमी करत असताना काही औषधांचा अपवाद लक्षात घेणे पण तितकेच महत्वाचे आहे. नाहीतर त्याचा परिणाम म्हणून पिकांवर स्क्रोचिंग येऊ शकते.
पीएच मीटर खरेदीसाठी येथे क्लीक करा.
श्री. सुशांत हिरालाल सुर्वे
डाळिंबशेती मार्गदर्शक, संगमनेर.